चीन विश्वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
नवी देहली : चीन लडाखमधील अतिक्रमणाविषयी भारतासमवेत चर्चा करत आहे, तर दुसरीकडे भारताला लागून असलेल्या ३ सहस्र ४८८ कि.मी.च्या सीमारेषेवर स्वतःची सैनिकी स्थिती आणखी बळकट करत आहे. चीनने तिबेटमध्ये तोफा, स्वयंचलित हॉवित्झर आणि भूमीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागणार्या सैनिकांचे युनिट मोठ्या प्रमाणात तैनात केली आहे. चिनी सैनिक युद्ध सामग्री एका जागेवरून दुसर्या ठिकाणी पाठवत आहेत. तसेच चीनने पँगाँग टीएस्ओ तलावाच्या क्षेत्रातील ‘फिंगर’ भागात नव्याने बांधकाम चालू केले आहे.
चीन नचुमूरपासून ८२ कि.मी. अंतरावर ३५ मोठी सैनिकी वाहने, चार १५५ एम्एम् पी.एल्.झेड. ८३ स्वयंचलित हॉवित्झर तोफा सिद्ध ठेवल्याचे भारताकडे पुरावे आहेत. प्रत्यक्ष नियंत्ररणरेषेपासून ९० कि.मी. अंतरावर असणार्या रुदोक येथील टेहळणी तळावर अतिरिक्त वाहनांची तैनात करण्यात आले आहे. त्या परिसरात नवीन बांधकाम चालू असल्याचेही आढळून आले असून ४ नवीन शेड आणि सैनिकांसाठी क्वार्टर बांधण्यात आल्याचे समजते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात