Menu Close

राजस्थानच्या रा.स्व. संघाच्या जिल्हाचालकांवर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

गुंड मकसूद पाया टोळीला हप्ते घेण्यास रोखल्याने आक्रमण केल्याचा संशय

काँग्रेसच्या राज्यात रा.स्व. संघाच्या संघचालकांवर प्राणघातक आक्रमण होते; मात्र काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष किंवा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र जर भाजपच्या राज्यात एखाद्या पुरो(अधो)गाम्यावर, अल्पसंख्य समाजाच्या नेत्यावर आक्रमण झाले असते, तर याच लोकांनी आकाशपाताळ एक केले असते !

कोटा (राजस्थान) : येथे दुचाकीवरून आलेल्या ३ आक्रमणकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजस्थानमधील जिल्हा संघचालक दीपक शहा यांच्यावर गोळ्या झाडून पलायन केले. शहा यांच्या दोन्ही पायाला गोळ्या लागल्या आहेत. त्यांना येथील महाराव भीम सिंह रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आक्रमणानंतर आजूबाजूच्या लोकांनी आक्रमणकर्त्यांचा पाठलाग करून त्यातील दोघांना पकडले, तर एकजण पळून गेला. घायाळ दीपक शहा यांनी सांगितले की, हे आक्रमण मकसूद पाया याच्या टोळीने केले आहे. त्यांना हफ्ते घेण्यापासून रोखल्याने त्यांनी आक्रमण केले.

आक्रमणाची माहिती मिळताच रामगंजमंडी शहरातील पोलीस ठाण्याबाहेर व्यापारी आणि संघाचे स्वयंसेवक यांनी गर्दी करून पोलीस ठाण्याला घेराव घालत निदर्शने केली. या घटनेमुळे शहरात रात्रभर तणावाचे वातावरण होते. त्यानंतर परिस्थिती लक्षात घेता रामगंजमंडी पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती. संतप्त व्यापार्‍यांनी आक्रमणाच्या निषेध करण्यासाठी १० फेब्रवारी या दिवशी शहर बंद ठेवण्यात आले होते.

श्रीराममंदिरासाठी देणगी गोळा करण्यातून आक्रमण झाल्याचा संशय

गेल्या आठवड्यात दीपक शहा यांचा रामगंजमंडी परिसरातील काही सराईत धर्मांध गुन्हेगारांशी श्रीराममंदिरासाठी देणगी गोळा करण्यावरून वाद झाला होता. त्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदवला गेला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *