Menu Close

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजवर सेन्सॉरशिप आणा : भाजपच्या खासदारांची एकमुखी मागणी

भाजपच्या खासदारांनी ही मागणी सरकारकडे लावून धरावी आणि अशा वेब सिरीजवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !

नवी देहली – वेब सिरीजच्या माध्यमातून हिंदूंच्या देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने वेब सिरीजवर सेन्सॉरशिप (निर्बंध) लागू करा, अशी मागणी लोकसभेत भाजपच्या खासदारांनी केली.

भाजपच्या विविध खासदारांनी लोकसभेत केलेल्या मागण्या

१. मनोज कोटक म्हणाले की, वेब सिरीजमध्ये अनावश्यक हिंसाचार, मद्यपान आणि हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे चित्रण दाखवले जात आहे. सरकारने यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार थांबवावा आणि वेब सिरीज सेन्सॉर करण्यात याव्यात.

२. किरीट सोलंकी यांनी म्हटले की, वेब सिरीजच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीवर प्रहार होत आहे. यामुळे युवा पिढीवर चुकीचा परिणाम होत आहे. ओटीटी अ‍ॅप्सवर सरकारने कारवाई करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे.

३. खासदार शंकर लालवानी म्हणाले की, भ्रमणभाषवर वेब सिरीजच्या माध्यमातून हिंसा, शिवीगाळ आदी दाखवले जात आहे. धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे त्याच्यावर सेन्सॉरशिप असली पाहिजे.

४. विनोदकुमार सोनकर यांनीही वेब सिरीजवर सेन्सॉरशिप लागू करण्याची मागणी केली. त्यांनी एका वेब सिरीजमधील पात्राचा उल्लेख करत म्हटले की, उत्तरप्रदेशातील एक उद्योग यामुळे अपकीर्त होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *