Menu Close

केरळ : रा.स्व. संघाने फसवून श्रीराममंदिरासाठी देणगी घेतल्याचे सांगत काँग्रेसच्या आमदाराचा थयथयाट

मुसलमान समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमायाचना !

  • भगवान श्रीरामाच्या मंदिराला देणगी दिल्याने मुसलमानांच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या जातात, हे एल्धोस कुन्नाप्ली यांनी हिंदूंना सांगितले पाहिजे ! काँग्रेस अशा मानसिकतेने वागत असेल, तर हा तिचा हिंदुद्वेषच होय !
  • इफ्तारच्या मेजवान्यांना इस्लामी गोल टोपी घालून जाणारे कधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून क्षमा मागतात का ?

कोची (केरळ) – माझ्या सवयीप्रमाणे मी रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना सामान्यपणे इतर मंदिरांना देतो तसे १ सहस रुपये दान दिले. लवकरच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ते अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामासाठी असल्याचे वृत्त पसरवायला प्रारंभ केला. मी एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे आणि त्यांनी मला मूर्ख बनवले. (हिंदूंच्या मंदिराला पैसे अर्पण दिले, तर तो धर्मनिरपेक्ष रहात नाही, अशी नवीन व्याख्या काँग्रेसच्या नेत्याने केली आहे, हे लक्षात घ्या ! चर्च किंवा मशीद यांना पैसे दिले, तर ती धर्मनिरपेक्षता होते, असेच काँग्रेसवाल्यांना वाटते का ?- संपादक, दैनिक सनातन प्रभात) संघाने नैतिकतेने राजकारण केले पाहिजे. (संघाकडून नैतिकतेची अपेक्षा करणारे किती नैतिक आहेत, हे जनतेला ठाऊक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘मी श्रीराममंदिरासाठी पैसे दिले’ या वृत्तामुळे मुसलमान समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची क्षमा मागतो, असे विधान केरळमधील काँग्रेसचे आमदार एल्धोस कुन्नाप्ली यांनी करत संघावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. (मुसलमानांना चुचकारणारे काँग्रेसी आमदार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

कुन्नाप्ली यांचे ३ कार्यकर्त्यांसमवेत श्रीराममंदिराच्या इमारतीच्या प्रतिमेसह असलेले कार्ड घेतांनाचे छायाचित्र सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. तथापि, ‘रा.स्व. संघाने माझी दिशाभूल केली आणि हे अन्य मंदिरासाठी आहे असे सांगितले’, असे कुन्नाप्ली यांनी सांगत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मला फसवले’ असा आरोप केला. (धर्मप्रेमी हिंदू आणि रामभक्त यांच्या भक्तीमुळे आणि त्यागामुळे अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जाईल, त्यासाठी एल्धोस कुन्नाप्ली यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्यांच्या पैशांची हिंदूंना आवश्यकता नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *