शेतकरी आंदोलनावरून पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने ‘टूलकिट’ ट्वीट केल्याचे प्रकरण
यावरून भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली कशा प्रकारे देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते. भारत सरकारने अशांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
बेंगळुरू (कर्नाटक) – स्विडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनावरून केलेल्या ट्वीटसोबत ‘टूलकिट’ (शेतकरी आंदोलनाविषयीची संपूर्ण रूपरेषा) प्रसारित केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी येथील २१ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती आणि विद्यार्थिीनी दिशा रवि या तरुणीला अटक केली आहे. ‘टूलकिट’मध्ये पालट करून आणखी सूत्रे समाविष्ट केल्याचा आणि ती पुढे पाठवल्याचा तिच्यावर आरोप आहे.
#Breaking: दिल्ली पुलिस साइबर सेल ने किसानों से संबंधित 'टूलकिट' फैलाने में कथित भूमिका निभाने वाली दिशा रवि को गिरफ़्तार किया। #Toolkit
LIVE: https://t.co/gfUtRWrNnZ pic.twitter.com/eze6sluJS9
— Zee News (@ZeeNews) February 14, 2021
याप्रकरणी ४ फेब्रुवारीला पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. दिशा हवामान पालटाविषयीशी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या अभियानाची संस्थापक सदस्या आहे. पोलिसांनी दिशाची चौकशी केल्यावर तिने ‘टूलकिटमध्ये पालट करून पुढे पाठवली’ अशी स्वीकृती दिली असल्याचे देहली पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले. या टूलकिटद्वारे भारतात शेतकरी आंदोलनावरून असंतोष निर्माण करण्याची रूपरेषा संबंधितांना देण्यात आली होती आणि त्यानुसार प्रत्येक कृती केली जात होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात