Menu Close

वर्ष २०२१ च्या आय.पी.एल्. स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व पुन्हा चीनच्या विवो आस्थापनाला !

बीसीसीआयचा राष्ट्रघातकी निर्णय !

  • यातून बीसीसीआयची ढोंगी देशभक्ती दिसून येते ! बीसीसीआयला देशभक्तीपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा वाटत असल्याने त्याने पुन्हा चीनच्या आस्थापनाला प्रायोजकत्व दिले, अन्यथा त्याने भारतीय किंवा अन्य एखाद्या विदेशी आस्थापनाला ते दिले असते !
  • याविषयी हस्तक्षेप करून बीसीसीआयचा हा राष्ट्रघातकी निर्णय केंद्र सरकारने पालटावा आणि त्याला समज द्यावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

चेन्नई – लडाखमधील गलवान खोर्‍यात चीनच्या सैन्याशी झालेल्या संघर्षानंतर भारतात चीनच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला होता. तेव्हा केंद्र सरकारने चीनच्या अनेक आस्थपानांचे कंत्राट रहित केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला.

त्याच वेळी ‘इंडियन प्रिमिअर लिग’ म्हणजे ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजकत्व असणार्‍या चीनच्या विवो आस्थापनासमवेतचा वर्ष २०२० च्या मुख्य प्रायोजकत्वाचा करार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) स्थगित केला होता; मात्र यंदा पुन्हा म्हणजे वर्ष २०२१ साठी बीसीसीआयने विवोला आय.पी.एल्. स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व दिले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *