Menu Close

भुताच्या आक्रमणानंतर मलेशियातील एक शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद !

मलेशियात अंनिस नसल्यामुळे शाळा बंद ठेवावी लागली आहे. अंनिस असती,  तर तिने असे होऊ दिले नसते आणि मुलांचा जीव धोक्यात आला असता !

कुआलालंपूर : उत्तर मलेशियामधील एका शाळेत भुताची सावली दिसल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्या शाळेला अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आले. भुताच्या अफवेनंतर संपूर्ण शाळेत भीतीचे वातावरण आहे. या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी शाळेत काळे कपडे परिधान केलेले भूत पाहिल्याचा दावा केला आहे. या भुताची आकृती शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये आढळून आली आहे.

१. शाळेच्या मुख्याध्यापिका सीती हवा मात म्हणाल्या, शाळेत एक आठवड्यापासून या घटना चालू आहेत. पहिल्या दिवशी २५ मुलांवर आक्रमणे झाली. त्यानंतर ५० मुलांवर आक्रमणे झाली. एवढेच नव्हे, तर ११ शिक्षकांवरही आक्रमणे झाली.

२. शिक्षक कामराह इब्राहिम म्हणाले, मी एक काळी सावली पाहिली. ती सावली माझ्या शरिरात घुसण्याचा प्रयत्न करत होती. माझे सहकारी चारही बाजूने उभे राहून कुराणचे आयते म्हणत होते.

३. इस्लामचे तज्ञ, विद्वान आणि तंत्र-मंत्राच्या साहाय्याने ही बाधा दूर करणार्‍यांना शांतीची प्रार्थना करण्यासाठी शाळेच्या परिसरात बोलावण्यात आले. तथापि प्रार्थना केल्यानंतरही ८ मुलांवर आक्रमण करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *