Menu Close

गेल्या ७४ वर्षांत पाकमध्ये एकही नवीन मंदिर उभारले नाही !

प्राचीन आणि जुन्या मंदिरांवर भू माफियांचे नियंत्रण

इस्लामी देश पाकमध्ये याहून वेगळी काय स्थिती असणार ? याविषयी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या. आता भारत सरकारनेच या मंदिरांच्या आणि तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताची फाळणी होऊन पाकची निर्मिती झाल्यानंतर तेथे हिदूंचे एकही नवीन मंदिर उभारले गेले नाही, तर २८६ मंदिरे न्यायालयातील खटल्यांमुळे बंद झाली. ऐतिहासिक मंदिरे भग्नावस्थेत आहेत. त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठीही सरकार साहाय्य करत नाही. पाकच्या लोकसंख्येत सुमारे अडीच टक्के (७५ लाख) हिंदू आहेत. एवढी मोठी संख्या असूनही फाळणीच्या ७४ वर्षांनंतरही पाकमध्ये मंदिर बांधले गेले नाही. स्थिती अशी आहे की, २ सहस्र वर्षे पुरातन असलेल्या ऐतिहासिक मंदिरांसह अनेक धार्मिक स्थळांवर भू माफियांचे नियंत्रण आहे, अशी माहिती पाकमधील हिंदू आणि शीख भारतात गेल्यानंतर त्यांच्या धार्मिक स्थळांच्या देखभालीचे दायित्व असलेल्या इव्हॅन्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे (ईटीपीबी) तारिक वजीर यांनी दिल्याचे वृत्ते दैनिक ‘दिव्य मराठी’ने दिले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खैबर पख्तूनख्वामध्ये जमियत उलेमा-ए- इस्लाम पक्षाच्या लोकांनी एका मंदिराला आग लावली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अल्पसंख्यकांच्या धार्मिक स्थळांची स्थिती जाणून घेण्यासाठी आयोग स्थापन केला आहे.

१. तारिक वजीर यांच्या माहितीनुसार पाकमध्ये सर्वाधिक २७५ मंदिरे पंजाबमध्ये आहेत. हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सिंधमध्ये ५३, खैबर पख्तूनख्वामध्ये २५ आणि बलुचिस्तान येथे १२ मंदिरे आहेत. सद्यःस्थितीत १४ मंदिरांची देखभाल ईटीपीबी करते, तर ६५ चे दायित्व हिंदूंकडे आहे.

२. पेशावरमधील गोरघत्री भागातील नाथ संप्रदायाचे गोरखनाथ मंदिर १९ व्या शतकाच्या मध्यात बांधण्यात आले. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीमुळे मंदिर बंद करण्यात आले. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून वर्ष २०११ मध्ये हे मंदिर पुन्हा उघडण्यात आले.

३. मंदिराचे व्यवस्थापन बघणारे सरपंच काका राम यांनी सांगितले की, २०० वर्षे जुन्या या मंदिराचे अनेक भाग अजूनही मूळ रूपात आहेत. पुरातत्व विभागाने मंदिराला ‘राष्ट्रीय वारसा’ तर घोषित केले; मात्र त्याचे संरक्षण आणि देखभाल यांसाठी काहीच केले नाही. ऐतिहासिक मंदिर वाचवता यावे; म्हणून आम्ही वैयक्तिक पातळीवर काही तरी करतो. त्याची दुरुस्ती न केल्यास एखाद्या दिवशी हे मंदिर कोसळेल.

४. मंदिरात पूजेसाठी कोहटहून आलेले हिंदूंचे नेते राजेश चंद यांनी सांगितले की, आम्ही मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले आहे. हिंदू एकमेकांशी जोडलेले रहावेत म्हणून आम्ही पेशावरहून आमच्या समुदायातील लोकांना येथे बोलावतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *