Menu Close

मालेगाव (नाशिक) येथे हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून तिचा निकाह लावल्याविषयी तक्रार प्रविष्ट !

  • हिंदु मुलींवर बळजोरी करणार्‍या धर्मांधांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक !
  • धर्मांधांकडून होणारे धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा सरकारने करावा, असे धर्मप्रेमी जनतेला वाटते !
  • धर्मांधांकडून हिंदु मुलींची वारंवार फसवणूक केली जाते. अशी फसवणूक टाळण्यासाठी हिंदूंनी मुलींना धर्मशिक्षण द्यावे !

मालेगाव (नाशिक) – येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून मुसलमान युवकाशी विवाह लावून दिल्याचा आरोप होत आहे. मुलीच्या आईने याविषयी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

१. संशयित शेख सद्दाम शेख, अब्दुल माबुद अन्सारी आणि जाफर अली आझाद अहमद यांच्यासह मालेगाव शहर काजी आणि नोटरी यांनी बळजोरीने दस्तावेज सिद्ध करून धर्मांतर करण्यास भाग पाडले.

२. वर्ष २०१८ मध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असतांना सद्दामने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने मुलगी बोलू शकली नाही. त्यानंतर वारंवार आरोपी सद्दाम, अब्दुल आणि जाफर यांनी तिचा छळ केला. तसेच अवैधरित्या तिचे धर्मांतर केले आणि सद्दाम हिच्यासमवेत संशयित अब्दुल, जाफर अन् मालेगाव शहर काजी यांनी निकाह लावून दिला.

३. मुस्लिम निकाहनामाची नोटरी करतांना त्यात निकाहाचा दिनांक नमूद केला नाही.

४. ‘मुलगी सज्ञान झाल्यावर मार्च २०२१ मध्ये तिचा निकाह लावून दिल्याचा खोटा दिनांक दाखवल्याने संबंधितांवर बाल लैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करावा, तसेच शहर काजी आणि नोटरी अधिवक्ता आर्.डी. खैरनार यांनी धर्मांतराचे असे किती अवैध दस्त सिद्ध केले ? याची चौकशी करून दोषींना अटक करावी’, अशी मागणी मुलीच्या आईने तक्रारीत केली आहे.

५. पीडित मुलगी आणि आरोपी सद्दाम यांनी मात्र मुस्लिम निकाहनामाची नोटरी कागदपत्रे पोलिसांना दाखवून विवाहास दोघांची संमती असल्याचे पोलिसांना सांगितले. (धर्मशिक्षण न दिल्याचे दुष्परिणाम ! – संपादक) पोलिसांनी त्यांचे ‘जबाब इन कॅमेरा’ घेऊन त्यांना सोडून दिले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *