- चीनच्या विस्तारवादी वृत्तीला भारत, अमेरिका आणि त्याच्या शेजारील देशांनी आव्हान दिल्यानेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना असे आवाहन करावे लागत आहे, हे लक्षात येते !
- शी जिनपिंग यांच्या अशा आवाहनामुळे येत्या १-२ वर्षांत जगाला तिसर्या महायुद्धाला सामोरे जावे लागल्यास आश्चर्य वाटू नये ! हे लक्षात घेता विशेषतः भारतीय सैन्याने आणि जनतेने युद्धसज्ज रहाण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
बीजिंग (चीन) – आपल्या देशाची सध्याची सुरक्षेची स्थिती अस्थिर आणि अनिश्चित आहे. अशा वेळी संपूर्ण सैन्याला युद्धाची सिद्धता वाढवणे आणि क्षमतेचा विस्तार यांसाठी समन्वय केला पाहिजे. तसेच कोणत्याही क्षणी येणार्या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यास सिद्ध असले पाहिजे, असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनच्या सैन्याला केले आहे.
‘देशाचे सार्वभौमत्व, संरक्षण आणि विकास यांचे रक्षण केले पाहिजे, तसेच सैन्याला एक आधुनिक समाजवादी राज्य बनवण्यासाठी भक्कमपणे साहाय्य केले पाहिजे’, असेही जिनपिंग म्हणाले. ते सैन्याच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेच्या वेळी बोलत होते.