हरिद्वार – उत्तराखंड सरकारने येथे होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित केले आहेत. जिल्ह्यात येणार्या सर्व शहरी भागांना पशूवधगृह मुक्त घोषित करण्यात आले आहे. शहरी विकास विभागाकडून संबंधित पशूवधगृहांना कुंभमेळ्याच्या आधीच या संदर्भातील नोटीस देण्यात आली आहे. संस्कृती आणि पर्यटन कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री रावत यांना या संदर्भातील पत्र दिले होते. या पत्रात सतपाल महाराज यांनी म्हटले होते की, हरिद्वार देशाची आध्यात्मिक अन् सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे येथे पशूवधगृहाची आवश्यकता नाही.