२ कार्यकर्ते आणि १ महिला पदाधिकारी यांना अटक
ताजमहाल ही हिंदूंची वास्तू असून तेथे शिवालय होते, याचे अनेक पुरावे आहेत. त्या भावापोटी हिंदू तेथे जाऊन पूजा करतात. ही वास्तू परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही ती न मिळाल्याने हिंदूंच्या धार्मिक भावन दुखावल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद न घेता अशा प्रकारे अटक होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
आगरा (उत्तरप्रदेश) – ताजमहाल हे प्राचीन शिवमंदिर असल्याचे हिंदूंमध्ये श्रद्धा आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक पु.ना. ओक यांनीही हे ‘तेजोमहालय’ नावाचे शिवमंदिर असल्याचे पुराव्यासहित पुस्तक लिहून म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदु महासभेचे २ पुरुष कार्यकर्ते आणि एक महिला पदाधिकारी यांनी ताजमहालमध्ये जाऊन शिवपूजन केले. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
महाशिवरात्रि पर ‘तेजो महालय’ के गुम्बद के पास जाकर किया शिव स्तोत्र का पाठ, महिला हिन्दू नेता समेत 3 हिरासत में#Mahashivratri #TajMahal #TejoMahalayahttps://t.co/EB24SQNSmM
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 11, 2021
१. सेंट्रल टँक येथील डायना बेंच येथे हिंदु महासभेच्या प्रांत अध्यक्षा मीना दिवाकर ताजमहालमध्ये जाऊन विधीपूर्वक आरती करू लागल्या. याच वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या सैनिकांनी त्यांना अटक केली. या वेळी मीना दिवाकर यांच्यासोबत २ कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना देहली पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. देहली पोलिसांकडून या ३ जणांची चौकशी केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय जाट आणि जिल्हाध्यक्ष रौनक ठाकूर काही कार्यकर्त्यांसह देहलीतील ताजगंज पोलीस स्थानकात गेले.
२. ताजमहाल येथे शाहजहान याचा ३ दिवसीय उरूस चालू आहे. नियमानुसार ताजमहाल येथे परंपरागत नमाजपठण केले जात आहे. उरूसविना कोणताही धार्मिक विधी करण्यावर ताजमहाल येथे बंदी घालण्यात आलेली आहे. (जर हिंदूंना शिवपूजन करण्याची अनुमती नाही, तर अशा प्रकारचा उरूस करण्यासाठी मुसलमानांना अनुमती का देण्यात आली आहे ? केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती देण्यात येऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)