Menu Close

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’कडून संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी !

  • आतंकवादी संघटनेकडून देणगी घेणारी संयुक्त राष्ट्रे म्हणे जगात आतंकवाद संपवून शांती आणणार ! हे लक्षात आल्यावर भारतानेही आता संयुक्त राष्ट्रांना न जुमानता आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी जिहादी आतंकवादी संघटना आणि त्यांना पोसणारा पाक यांना नष्ट करणे आवश्यक !
  • संयुक्त राष्ट्रांनी जिहादी आतंकवादी संघटनेकडून पैसे स्वीकारणे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी बलाढ्य देशांना मान्य आहे का ? या संघटनेचे खरे स्वरूप उघड झाल्यावर ही संघटनाच बरखास्त करण्याची मागणी भारताने लावून धरणे आवश्यक !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – भारताने बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’ने (एस्.एफ्.जे.ने) समर्थन मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. गुरपतवंतसिंह पन्नू हा या संघटनेचा प्रमुख आहे.

१. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, १ मार्च या दिवशी या संघटनेकडून ही देणगी देण्यात आली होती. जोपर्यंत कोणती व्यक्ती किंवा संघटना संयुक्त राष्ट्रांच्या बंदी घातलेल्यांच्या सूचीमध्ये नाही, तोपर्यंत तिच्याकडून देणगी घेण्याचे आम्ही नाकारत नाही. (आतंकवाद्यांकडून पैसे घेण्याच्या कृतीचे अश्‍लाघ्य समर्थन करणारी संयुक्त राष्ट्रे ! यातून संयुक्त राष्ट्रांची हीन मानसिकता  दिसून येते ! – संपादक)

२. सिख्स फॉर जस्टिसकडून भारतातील कृषी कायद्यांचा जागतिक स्तरावर विरोध केला जात आहे. तसेच याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी कथित अयोग्य वर्तन केल्याच्या प्रकरणी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने एक समिती स्थापन करावी, यासाठी ही संघटना प्रयत्न करत आहे. त्यासाठीच तिने संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपये दिल्याचे म्हटले जात आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *