Menu Close

सोलापूर येथे महिलादिनानिमित्त धर्मप्रेमी युवतींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

सोलापूर – हिंदु युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना धर्मांतरित केले जाते. हे मुघलांच्या काळापासून चालू आहे, याचे अनेक दाखलेही उपलब्ध आहेत. महंमद गझनीने तर ७० सहस्र हिंदु स्त्रियांना इस्लामी राष्ट्रात विकले होते. ‘लव्ह जिहाद’ हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील षड्यंत्र आहे. विवाहप्रस्ताव देणार्‍या काही संकेतस्थळांवरही ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे समोर आली आहेत. ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्राला बळी न पडण्यासाठी प्रत्येक युवतीने शौर्याची उपासना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

युवतींच्या शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ मार्च या दिवशी धर्मप्रेमी युवतींसाठी हे ‘ऑनलाईन’ शौर्य जागृती व्याख्यान आयोजित केले होते. युवतींनी स्वत:तील आत्मबळ वाढवण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या व्याख्यानात धर्मप्रेमी युवतींनी सहभाग घेतला.

अभिप्राय

१. कु. प्राजक्ता लटके – प्रत्येक युवतीने स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे हे आजच्या व्याख्यानामुळे लक्षात आले.

२. कु. अमृता नरुटे – आजच्या व्याख्यानातून समाजातील सत्यस्थिती लक्षात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *