Menu Close

ओडिशा : गोतस्करीच्या विरोधात कार्य करणार्‍या तीर्थ कुमार साहू यांना १६ दिवसांच्या पोलीस कोठडीत पुष्कळ मारहाण !

गोतस्करीच्या विरोधात कार्य करणार्‍या सहिष्णु हिंदूंना मारहाण करणारी पोलीस यंत्रणा गोतस्करी, गोहत्या करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणार्‍या धर्मांधांच्या विरोधात ब्रही काढत नाही, हे लक्षात घ्या !

निवेदनासहित श्री. अनिल धीर आणि गो ज्ञान फाऊन्डेशन अन् भारत रक्षा मंच यांचे हिंदुत्वनिष्ठ

निवेदनासहित श्री. अनिल धीर (१) आणि गो ज्ञान फाऊन्डेशन अन् भारत रक्षा मंच यांचे हिंदुत्वनिष्ठ

भुवनेश्‍वर (ओडिशा) : येथील गोतस्करी करणार्‍यांच्या विरोधात कार्य करणारे आणि देहली येथील गो ज्ञान फाऊन्डेशन संघटनेचे हिंदुत्वनिष्ठ तीर्थकुमार साहू यांना पोलीस कोठडीत डांबून अनुमाने १६ दिवस पुष्कळ मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. शेवटी २० एप्रिल या दिवशी रायगडा जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधिशांनी त्यांना जामीन संमत केला. येथील जिल्हाधिकारी जगन्नाथ मोहंती यांनी साहू यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांना पोलिसांच्या कह्यात दिले होते. पोलिसांनी साहू यांच्यावर विविध गंभीर आरोप नोंद केले.

तीर्थ कुमार साहू

१. केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी या प्रकरणात स्वत: नोंद घेऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना जिल्हाधिकार्‍यांच्या संशयी भूमिकेच्या संदर्भात पत्र लिहिले. (मेनका गांधी यांच्यासारखी गोरक्षणाची तळमळ अन्य हिंदुत्वनिष्ठ नेत्यांमध्ये केव्हा निर्माण होणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. यानंतर अनेक दिवस होऊन गेले; परंतु जिल्हाधिकार्‍यांवर कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नाही.

३. तीर्थ कुमार साहू यांनी ओडिशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना एका याचिकेद्वारे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि गोतस्कर यांच्यातील साटेलोट्यावर प्रकाश टाकला आहे.

४. भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय समन्वयक श्री. अनिल धीर आणि बलराम पांडा यांनीही या निवेदनाला आपले समर्थन दर्शवले आहे.

५. श्री. धीर यांनी या वेळी चेतावणी दिली आहे की, राज्यशासन जर गोतस्करी करणार्‍यांच्या आणि हिंदुत्वनिष्ठांवर खोटी प्रकरणे प्रविष्ट करणार्‍यांच्या विरोधात तत्परतेने योग्य ती कारवाई करणार नसेल, तर गो ज्ञान फाऊन्डेशन आणि भारत रक्षा मंच या संघटना राज्यव्यापी आंदोलन करतील.

६. तीर्थ कुमार साहू पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह यांना भेटणार असल्याची माहिती भारत रक्षा मंचचे समन्वयक श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी दिली आहे.

७. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून त्यांनी राज्यशासनाला या प्रकरणात नोटीस बजावली आहे.

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना लिहिलेल्या पत्रातील गंभीर सूत्रे

१. प्रत्येक मासात ओडिशातून अडीच लाख गायींची बंगाल, तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांत तस्करी केली जाते. या प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस तस्करांना साहाय्य करतात.

२. ज्या-ज्या लोकांनी या तस्करीच्या विरोधात आवाज उठवला, त्यांना अटक करण्यात येऊन त्रास देण्यात आला.

३. २२ वर्षीय तीर्थ कुमार साहू हे गेल्या ३ वर्षांपासून गोरक्षा करण्यासाठी आणि गोतस्करीच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांनी ओडिशातील उच्च न्यायालयामध्ये पोलिसांच्या संदिग्ध भूमिकेच्या विरोधात १८० हून अधिक याचिका दाखल केल्या आहेत.

४. गेल्या वर्षी श्री. साहू यांनी राष्ट्रपतींना या विषयावर निवेदन पाठवले होते. त्यावर राष्ट्रपतींनी साहू आणि त्यांच्या सहकार्‍यांना चर्चा करण्यासाठी देहली येथे आमंत्रित केले होते.

५. या सर्वांचा राग धरून रायगडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी साहू यांच्यावर कठोर कारवाई केली.

६. मार्च मासात सहस्रो गायींच्या झालेल्या तस्करीच्या विरोधात ४ एप्रिल या दिवशी साहू जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध नोंदवण्यासाठी गेले. त्या वेळी उपजिल्हाधिकारी इशाक मदीना यांनी साहू यांचे निवेदन फाडले, तर जिल्हाधिकारी जगन्नाथ मोहंती यांनी साहू यांना मारले. या वेळी उपस्थित पोलीस उपायुक्त संतनू मोहंती यांनीही साहू यांना मारहाण केली. (प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांचे खरे स्वरूप जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

७. त्यानंतर साहू यांच्यावर खोटे आरोप लावत त्यांना अटक करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *