नवी देहली – गेल्या एक मासामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात म्हणजे ६३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
१. गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे. पंजाब दुसर्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. या ५ राज्यांत ७८ टक्के नवे रुग्ण आढळून आले.
२. देशात १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत २ लाख ९७ सहस्र ५३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या काळात १ सहस्र ६९८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत देशात एकूण १ कोटी १४ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात २ लाख २० सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.
३. महाराष्ट्रात सुमारे ६५ टक्के नवे रुग्ण आहेत. गेल्या एक मासामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या साडेतीन पटींनी वाढली. १६ फेब्रुवारीला येथे ३७ सहस्र १२५ सक्रीय रुग्ण आढळून आले होते. ते वाढून १५ मार्चपर्यंत १ लाख ३० सहस्र इतके झाले. देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ७० टक्के महाराष्ट्रातील आहेत.