फोंडा (गोवा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan/registration-form या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !
अधिवेशनासाठी सभागृह, निवास, भोजन, प्रदर्शन, स्थानिक वाहतूक इत्यादी कारणांसाठी अनुमाने ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धर्मप्रेमी दानशुरांनी या कार्यासाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे. या धर्मदानावर आयकर कायदा, १९६१ नुसार ८०जी(५) नुसार आयकरात सूट मिळू शकते. अर्पणदाते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. धनादेश हिंदु जनजागृती समितीच्या नावे स्वीकारले जातील.
धर्मदानासाठी विवरण
बँकेचे नाव : IDBI Bank शाखेचे नाव : नवीन पनवेल
बचत खाते क्रमांक : 023104000180320
आयएफ्एस्सी क्रमांक : IBKL0000023
विशेष सूचना : धर्मदान म्हणून बँकेत निधी जमा केल्यानंतर त्यासंबंधीची तपशीलवार माहिती [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावी किंवा श्री. सुरजित माथुर यांना ०८४५१००६०७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात