Menu Close

राजस्थान : १२ वर्षीय मुलाने केला ६ वर्षांच्या बहिणीवर बलात्कार !

ऑनलाईन शिक्षणाच्या वेळी भ्रमणभाषवर अश्‍लील व्हिडिओ पहाण्याचे लागले होते व्यसन !

आपले पाल्य भ्रमणभाषवर काय पहात आहे, हे पहाणे पालकांचे दायित्व असतांना त्यांनी लक्ष न ठेवल्यानेच ही घटना घडली, असेच म्हणावे लागेल !

श्रीगंगानगर (राजस्थान) – येथील रायसिंहनगरमध्ये एका १२ वर्षीय मुलाने भ्रमणभाषमध्ये अश्‍लील व्हिडियो पहात स्वतःच्या ६ वर्षांच्या लहान बहिणीवर बलात्कार केला. पोलिसांनी या मुलाला कह्यात घेतले आहे.

प्राथमिक तपासणीत समोर आले की, आरोपी विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून त्याच्या वडिलांच्या भ्रमणभाषसंचावरून ऑनलाईन शिक्षण घेत होता. असे शिक्षण घेत असतांना एक दिवस त्याला अश्‍लील व्हिडियोची नोटीफिकेशन आली आणि नकळतपणे त्याच्याकडून ती दाबली गेली. तेव्हापासून त्याला अश्‍लील व्हिडियो पहाण्याचे व्यसन लागले. त्यातून बलात्काराची घटना घडली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *