राजस्थानमधील घटना
धर्मांधांनी पुस्तकेही जाळली !
- धर्मांध त्यांच्या धर्माच्या विरोधात काहीही झाले, तर थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू साधा निषेधही व्यक्त करत नाहीत !
- काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! येथे धर्मांधांचा उद्दामपणा वाढल्यास नवल ते काय ?
जयपूर – येथे एका पुस्तकामध्ये इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण असणारे पुस्तक प्रकाशित केल्यामुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी पुस्तकाचे प्रकाशन करणार्या संजीव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयावर आक्रमण करून तोडफोड केली. तसेच येथे ठेवण्यात आलेल्या पुस्तकांची जाळपोळ केली. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. या प्रकाशन संस्थेकडून इयत्ता १२ वीचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण आहे. हे पुस्तक वर्ष २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. ४ वर्षांनंतर त्याचा विरोध करण्यात आला.
Jaipur: The office of Sanjiv Prakashan, a book publishing company was vandalised today by a group of people allegedly over content relating to Islamic terrorism in a book published by them
Police say, three people arrested in the incident#Rajasthan pic.twitter.com/yaI7A7eQX5
— ANI (@ANI) March 17, 2021
१. संजीव प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापक विजय शंकर शुक्ला यांनी सांगितले की, राज्यशास्त्राच्या पुस्तकामुळे हे आक्रमण करण्यात आले आहे. यात इस्लामी आतंकवादाविषयी एक प्रश्न विचारण्यात आला आहे आणि त्याला उत्तर देण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेमध्येही हा प्रश्न विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे हे लिखाण आणि पुस्तक मागे घेण्यात आले असतांनाही हे आक्रमण झाले आहे. (असे असतांनाही धर्मांध आक्रमण करतात, यावरून त्यांची धर्मांधता दिसून येते ! – संपादक)