अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिरासाठी श्रीलंकेत ज्या ठिकाणी रावणाने सीतामातेला बंदी बनवून ठेवले होते, त्या ‘सीता एलिया’ तेथील एक दगडही याच्यासाठी वापरण्यात येणार आहे. हा दगड श्रीलंकेचे उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांच्या माध्यमातून भारतात आणण्यात येणार आहे. ‘सीता एलिया’ येथेच अशोक वाटिका आहे. येथेच सीतामातेला ठेवण्यात आले होते. येथे सीता अम्मन कोविले नावाचे मंदिरही आहे.
श्रीलंकेत जेथे सीतामातेला बंदी बनवून ठेवण्यात आले होते, तेथील दगड श्रीराममंदिराच्या बांधकामासाठी आणणार !
Tags : हिंदु धर्म