Menu Close

लव्ह जिहाद’ला मुळासकट नष्ट करण्यासाठी सर्व हिंदू युवतींनी सक्षम आणि संघटित होणे आवश्यक ! – सुमित सागवेकर

श्री. सुमित सागवेकर

पुणे – हिंदु भगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ म्हणजे आपल्या हिंदु संस्कृतीच्या अस्मितेवरच घाव घालणारे धर्मांधांचे फार मोठे षड्यंत्र आहे. याला वेळीच रोखले नाही, तर आपल्या देशामध्ये याची पाळेमुळे अजून घट्ट होत जातील. हे टाळण्यासाठी वेळीच सावध होऊया. धर्मांधांच्या या कारस्थानाला कोणतीही हिंदु युवती बळी पडणार नाही, यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील हिंदु युवतींसाठी ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. व्याख्यानाचा आरंभ श्री गणेशाच्या श्‍लोकाने झाला. व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. चैत्राली कुलकर्णी यांनी केले.

त्यांनी ‘लव्ह जिहाद’ची पार्श्‍वभूमी, त्याचा सत्य इतिहास आणि सध्या हिंदी चित्रपटसृष्टी पासून ते सर्वच लहान मोठ्या क्षेत्रांत हा ‘लव्ह जिहाद’ कसा फोफावत आहे, हे उदाहरणे देऊन अन् अधिकृत माहितीच्या आधारे स्पष्ट केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद’ ग्रंथाविषयी माहितीही देण्यात आली. ‘प्रत्येक हिंदु युवतीने हा ग्रंथ आपल्यासमवेत ठेवावा’, असे आवाहन श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

या व्याख्यानाला पुणे, चिंचवड आणि सातारा येथील स्वरक्षण प्रशिक्षण घेणार्‍या हिंदु युवती उपस्थित होत्या.

युवती आणि महिला यांचे अभिप्राय

१. स्वरदा गोसावी – व्याख्यान ऐकल्यानंतर मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी साधना करून प्रशिक्षण घेतले पाहिजे. आपल्याशी जोडलेल्या नातेवाईकांना महत्त्व पटवून द्यायला हवे.

२. नम्रता गोसावी – व्याख्यान ऐकल्यानंतर विषय मनात खोलवर गेल्यासारखे वाटत असून ‘लव्ह जिहाद’ विरोधात लढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

क्षणचित्र  : लव्ह जिहाद विषयाची माहिती मिळाल्यानंतर आमच्यात जागृती निर्माण होऊन परिस्थितीचे गांभीर्य ही लक्षात आल्याचे उपस्थित युवतींनी सांगितले. ‘या षड्यंत्राच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आमचे मित्रमंडळी, नातेवाइक यांनाही हा विषय सांगून जागृती करू’, असे उपस्थित युवतींनी उत्स्फूर्तपणे सांगून ‘जय भवानी’चा जयघोष केला.

व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे मुलींवर अयोग्य संस्कार होऊ नयेत, यासाठी कोणतीही मालिका न लावणार्‍या धर्मप्रेमी महिला !

पुण्यातील धर्मप्रेमींसाठी जे शौर्यजागृती व्याख्यान झाले, त्या व्याख्यानाला कासुर्डी येथील कृतीशील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे जोडल्या होत्या. त्यांना ३ मुली आहेत. व्याख्यानामध्ये श्री. सुमित सागवेकर यांनी जो विषय मांडला, त्यामधील घरातील मुलींशी पालकांनी कसा संवाद ठेवायला हवा ? तसेच सध्या तरुण मुला-मुलींच्या अंगावरील ‘टॅटू’ संदर्भात सांगितलेली सूत्रे सौ. शिंदे यांना मनापासून पटली. व्याख्यानानंतर आपल्या मुलींवर अयोग्य संस्कार होऊ नये; म्हणून त्यांनी व्याख्यान झालेल्या दिवसापासून आजपर्यंत घरातील दूरचित्रसंचावर कोणतीही मालिका लावली नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *