हिंदु जनजागृती समितीची ‘आदर्श होलिकोत्सव साजरा करा !’ मोहीम
पेण (जिल्हा रायगड) – होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारी महिलांची छेडछाड, रासायनिक रंगांचा वापर, प्रदूषणास कारणीभूत कचर्याची होळी यांसारखे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने साहाय्य करावे, यासाठी पेण येथील तहसीलदार डॉ. अरुणा जाधव आणि पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरमेठ यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारतांना गौरीप्रसाद हिरमेठ यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. आम्ही नक्कीच साहाय्य करू. काही अपप्रकार लक्षात आल्यास कळवा’, असे सांगितले.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री. अनिकेत खैरे, श्री. मयुरेश वेदपाठक, श्री. निकित पाटील, श्री. सोहम माने, धर्मप्रेमी श्री. वैभव आकुत, श्री. गुरु पाटील, गोरक्षक श्री. मंगल पाटील, समितीचे श्री. मनीष माळी आणि श्री. दिलदास म्हात्रे, सनातन संस्थेच्या वतीने श्री. अरुण भोईर उपस्थित होते.