भिगवण (पुणे) येथे गोवंशियांची वाहतूक करणार्या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद, १७ गोवंशियांची सुटका राज्यात गोवंशहत्या बंदी असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूकही चालू आहे !
भिगवण (पुणे) – बारामती येथून २० मार्च या दिवशी जावेद कुरेशी याचा टेम्पो हा भिगवण राषीन रस्त्यावरून धाराशिव येथे गोवंशियांच्या कत्तलीसाठी जाणार आहे, अशी माहिती सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेच्या गोरक्षकांना समजल्यावर त्यांनी सायंकाळी ८ वाजता टेम्पो पकडला आणि तात्काळ पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोलला कळवले. या प्रकरणी गाडीचालक मुजीब खुरेशी, समिर शेख यांच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व गायींना बोरमलनाथ गोशाळा चौफुला येथे सुखरूप सोडले आहे. (नेहमीच गोवंशियांच्या कत्तलीसाठी वाहन जात आहे, याची माहिती पोलिसांच्या अगोदर गोरक्षकांना कशी काय मिळते ? हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. पोलिसांनी याविषयी उपाययोजना काढावी, अशी अपेक्षा आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात)
या वेळी निखिल दरेकर, शादाब मुलाणी, सचिन शित्रे, नीलेश पवार या गोरक्षकांना भिगवण पोलीस ठाण्यामधील सर्व आधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. भिगवण पोलिसांनी टेम्पोची पहाणी केली असता १५ गायी, १ बैल आढळले. ज्यामध्ये ४ गायींचे चारही पाय घट्ट दोरीने बांधलेल्या अवस्थेत, तसेच १ गाय मृत अवस्थेत आणि अन्य सर्व गायी घायाळ अवस्थेत आढळून आल्या.
या वेळी गोवंशियांची कत्तलीसाठी किंवा गोमांसाची वाहतूक होत असल्यास सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन गोरक्षकांनी केले आहे.