Menu Close

विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू !

जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांचे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला आश्‍वासन

आमदार श्री. विनय कोरे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. सुनील घनवट आणि अन्य

वारणानगर (कोल्हापूर) – विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू. यानंतर २ मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करू, असे आश्‍वासन पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातील आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री. विनय कोरे यांनी दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी श्री. कोरे यांना विशाळगडाच्या एकूण परिस्थितीविषयी अवगत करून निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले.

या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, श्री. शिवानंद स्वामी, तसेच अन्य उपस्थित होते. या वेळी श्री. कोरे यांनी ‘विशाळगड येथील मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी आमदार निधीचा वापर करू’, असेही सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *