देहली येथील विविध चर्च यांवर हिंदुत्वनिष्ठांनी आक्रमणे करण्याच्या खोट्या आणि निराधार आरोपांना ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमे आता या प्रकरणाविषयी मूग गिळून गप्प का बसली आहेत ? हीच का त्यांची धर्मनिरपेक्षता ?
- अनेक महिला संत आणि साधिका यांना आता रहायला छप्परही नाही !
- महानगरपालिकेडून स्थगितीची प्रत मिळाली नसल्याचा कांगावा !
चंदीगड : येथील ४० वर्षे जुन्या श्री नांगली आश्रमाला पाडण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देऊनही चंदीगड महानगरपालिकेने आश्रमाची इमारत आणि तेथील शिवाचे मंदिर पाडले. या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी स्थानिक न्यायालयाला स्पष्टीकरण देत म्हटले की, आश्रम पाडल्यानंतर आम्हाला स्थगितीची प्रत मिळाली. (हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते, हे तरी प्रशासनाला माहीत होते कि नाही ? प्रशासनाला काहीही करून मंदिर आणि आश्रम पाडायचाच होता, हे यातून सिद्ध होते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यावर आश्रमाचे प्रमुख संत रामेश्वर नंद पुरीजी यांच्या अधिवक्त्याने महानगरपालिकेवर आरोप लावत न्यायालयात सांगितले की, आश्रमाला पाडण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्याची कागदपत्रे आश्रम पाडण्याआधीच आम्ही अधिकार्यांना दाखवली होती; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आणि न्यायालयाचा अवमान करत आश्रम आणि तेथील शिव मंदिर पाडले. याचे आम्ही ध्वनीचित्रीकरणही केले आहे. (यावरून चंदीगड महानगरपालिकेचा हिंदुद्रोहच स्पष्ट होतो. अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळांविषयी कधी महानगरपालिकेचे अधिकारी अशी भूमिका घेऊ धजावले तरी असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मे या दिवशी होणार आहे.
१. आश्रम पाडण्यावर स्थगिती देऊनसुद्धा आश्रम पाडण्यात आल्याच्या विरोधात याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती.
२. ४ एप्रिल या दिवशी देण्यात आलेल्या स्थगितीच्या आदेशात न्यायालयाने म्हटले होते की, महानगरपालिकेने सदर आश्रम पाडण्याआधी त्याची वस्तूनिष्ठ कारणे द्यावीत. तोपर्यंत आश्रम पाडण्यात येऊ नये.
३. पाडापाडीमुळे आश्रमातील महिला संत आणि साधिका यांनी येथील मुख्य रस्त्यावर अनेक दिवस रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना बाजूला केले.
नेमके काय आहे प्रकरण ?
४० वर्षांपूर्वी एका साधकाने आश्रमाला सेक्टर ५० च्या कॉलनी क्र. ५ मधील भूमी अर्पण केली होती, तेथे आश्रम बांधण्यात आला; परंतु २० वर्षांपूर्वी ही कॉलनी चंदीगड प्रशासनाने विकत घेतली. त्या वेळी आश्रम व्यवस्थापनाने प्रशासनाला रीतसर १ लाख ८० सहस्र रुपये देऊ करून आश्रमाची भूमी आश्रमाच्या अखत्यारीत रहावी, अशी विनंती केली होती.
४ एप्रिल या दिवशी महानगरपालिकेद्वारे नांगली आश्रम आणि तेथील शिवाचे मंदिर जेसीबीने पाडण्यात आले. तेव्हा शिवाची पिंड इतस्त: पडली होती. चंदीगड ट्रिब्यूनच्या संकेतस्थळानुसार, आश्रम पाडल्यामुळे तेथे अनेक वर्षांपासून रहाणार्या महिला संत आणि अनेक साधिका यांना आता रहायला छप्परही राहिलेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात