राष्ट्रप्रेमींचा विरोध असूनही पाकिस्तानी गझल गायकाला पुरस्कार देणारे देशभक्त आहेत का ?
कर्णावती : २२ एप्रिल या दिवशी येथील एका कार्यक्रमात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध डावलून हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (शत्रूराष्ट्राला आणि त्यांच्या पैसे कमावण्यासाठी भारतात येणार्या कलाकारांना केवळ शिवसेनाच प्रखर विरोध करते, अन्य राजकीय पक्ष ते करत नाहीत; कारण तसे करणे हे निधर्मीवादाच्या विरोधात आहे, असे त्यांना वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. प्रवचनकार मुरारी बापू यांच्या चित्रकूट धाम न्यासाकडून १९ ते २२ एप्रिल दरम्यान आयोजित अस्मिता पर्वाची भावनगर जिल्ह्यातील तलगजरदा गावात पुरस्कार कार्यक्रमाने सांगता झाली. त्यात गुलाम अली यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाविषयी हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (अशा प्रवचनकारांवर हिंदूंनी बहिष्कार घातला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत निदर्शने केली. त्यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन कार्यक्रम संपल्यानंतर सोडून दिले.
२. वास्तविक गुलाम अली यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने या पर्वाचे उद्घाटन होणार होते. पण त्यांचा कार्यक्रम ऐन वेळी काही कारणांमुळे रहित करण्यात आला होता. सकाळी पुरस्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर गुलाम अली लगेच पाकिस्तानला परतले.
३. गुलाम अली यांचा गेल्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईत होणारा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रहित करावा लागला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात