Menu Close

होळीसाठी रोवण्यात आलेला ‘प्रल्हाद’ (खांब) पोलिसांनी उखडून फेकला !

जयपूर येथे पोलीस अधिकार्‍याकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न

असे पोलीस भारताचे कि पाकचे ? राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदूंच्या धार्मिक परंपरा पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होणारच ! अशा प्रकारची अन्य धर्मियांची धार्मिक परंपरा पायदळी तुडवण्याचा प्रयत्न पोलीस कधीही करत नाहीत, हे लक्षात घ्या !

जयपूर (राजस्थान) – हिंदु धर्मातील मुख्य सणांपैकी एक असलेल्या होळीच्या निमित्ताने सर्व हिंदूंच्या वतीने बदनपुरा पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या एका चौकात होळी पेटवण्यासाठी ‘प्रल्हाद’ (होलिका आणि तिच्या मांडीवर भक्त प्रल्हाद बसलेला, हे दाखवणारा प्रतीकात्मक खांब) रोवण्यात आला होता. ही परंपरा मागील १०० वर्षांहून अधिक काळापासून चालू आहे. हा ‘प्रल्हाद’ गलतागेट पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश यांनी उखडून फेकून दिला. तसेच त्यांनी उपस्थित हिंदूंना चेतावणी दिली, ‘येथे होळी पेटणार नाही आणि जे येथे होळी पेटवण्याचा प्रयत्न करतील त्यांना कारागृहात डांबण्यात येईल.’ (हिंदूंवर अशा प्रकारे मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) अशा प्रकारे पोलीस अधिकारी सतीश यांनी हिंदु धर्माचा अपमान केला, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी सतीश यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार धर्माभिमानी हिंदूंच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *