बांगलादेशानंतर आता पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण ! याविषयी भारत सरकार कधी कृतीशील होऊन अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करणार ?
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या रावळपिंडी शहरामध्ये १०० वर्षे जुने असलेल्या मंदिरावर १० ते १५ धर्मांधांनी आक्रमण केले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असतांना हे आक्रमण करण्यात आले. त्यांनी मंदिराच्या वरच्या मजल्याचे दार आणि पायर्या तोडून टाकल्या. या घटनेची तक्रार इवैक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे (ईटीपीबीचे) उत्तर प्रांताचे सुरक्षा अधिकारी सैयद रजा अब्बास जैदी यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. मंदिराचे प्रशासक ओम प्रकाश यांनी सांगितले की, मंदिर आणि माझ्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे.
Pakistan: 100-year-old Hindu temple attacked in Rawalpindi, where only recently, temple bells had been sounded after 74 long yearshttps://t.co/rwTGrODprN
— OpIndia.com (@OpIndia_com) March 29, 2021
जैदी यांनी सांगितले की, या मंदिरावर अतिक्रमण करण्यात आले होते जे आम्ही ४ दिवसांपूर्वी हटवले होते. अद्याप या मंदिरात मूर्ती ठेवण्यात आली नव्हती, तसेच कोणतेही धार्मिक कृती केली जात नव्हती.