शिर्डी : महाराष्ट्रामधील काही मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी महिलांकडून करण्यात येत असलेले आंदोलन, हा प्रसिद्धीचा स्टंट असून या महिला लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका अखिल भारतीय आतंकवादविरोधी मोर्च्याचे अध्यक्ष मणिंदरजीतसिंह बिट्टा यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर केली आहे. बिट्टा येथील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते.
या वेळी बिट्टा म्हणाले, पूर्वजांपासून परंपरा चालत आल्या असून त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. आमची मंदिरे समाजाला बांधून ठेवतात. ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही, त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी महिलांच्या मागणीला माझा विरोध आहे. (शीख नेत्याला हिंदूंच्या मंदिराविषयी जी संवेदनशीलता आहे, तशी संवेदनशीलता किती हिंदु धर्मीय नेत्यांना आहे ? केवळ हिंदूंच्या मतांवर निवडून यायचे एवढेच माहीत असणार्या या नेत्यांना धर्मपरंपरांची काय किंमत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात