चीनला आनंद होणारच; कारण अशा चर्चेतून काहीही साध्य होणार नाही आणि पाक भारतात आतंकवादी कारवाया चालूच ठेवणार, हे चीनला ठाऊक आहे !
बीजिंग (चीन) – भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चालू होणार्या द्विपक्षीय चर्चेविषयी आम्हाला आनंद होत आहे. क्षेत्रीय विकास, शांतता आणि स्थिरता यांसाठी आणखी अधिक सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता असणार आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
China 'happy' over Pakistan-India 'active interactions': FM spokesman https://t.co/4IpbKNP1PZ
— TOI India (@TOIIndiaNews) March 29, 2021
भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्याने २५ फेब्रुवारी या दिवशी शस्त्रसंधी करार लागू करण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सैन्यदलप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारतासमवेत शांततेची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. ताजिकिस्तानमध्ये होणार्या ‘हार्ट ऑफ आशिया’ परिषदेत भारत आणि पाकिस्तान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे म्हटले जात होते; मात्र पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ही शक्यता फेटाळून लावली. बैठकीविषयी कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी सांगितले.