Menu Close

मंदिरांच्या दानपेटीत गर्भनिरोधक आणि अश्‍लील पत्रे टाकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

देवाचा शाप लागल्याने एका धर्मांधाचा मृत्यू, तर अन्य एकाची प्रकृती बिघडल्याने त्याने दिली गुन्ह्याची स्वीकृती !

‘देव नाही’ असे म्हणणार्‍या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

मंगळुरू (कर्नाटक) – येथील कोरगज्जा देवस्थानाच्या दानपेटीत गर्भनिरोधक आणि अश्‍लील लिखाणाचे कागद टाकल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जोकट्ट येथील अब्दुल रहीम आणि अब्दुल तौफिक यांना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेले रहीम आणि तोफिक हे भगवान कोरगज्जाच्या शापाच्या भीतीने देवाला शरण आले. त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली. मंगळुरू पोलीस आयुक्त एन्. शशीकुमार यांनी ही माहिती दिली. गेल्या ३ मासांत अशा प्रकारची अश्‍लील कृत्य करण्याची ४-५ प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रारीही करण्यात आल्या आहेत. पोलीस आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरल्याने भाविकांनी ‘भगवान कोरगज्जाने गुन्हेगारांना शिक्षा करावी’, अशी प्रार्थना केली. येथील भाविकांची भगवान कोरगज्जावर श्रद्धा असून त्याला भगवान शिवाचा अवतार मानले जाते.

एका धर्मांधाचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, अब्दुल रहीम आणि अब्दुल तौफिक यांना त्यांचा मित्र नवाज मंदिरात घेऊन जात होता. स्वतःला तो मांत्रिक असल्याचे सांगत असे. या तिघांनी हे अश्‍लाघ्य कृत्य केले होते. काही दिवसांनी नवाज याची प्रकृती बिघडली. त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्याने भींतीवर डोके आपटून स्वतःचे जीवन संपवले. मरण्यापूर्वी त्याने ‘भगवान कोरगज्जाचा हा शाप आहे’, असेे सांगितले. नवाजचा मृत्यू झाल्यानंतर तौफिक याचीही प्रकृती ढासळू लागली आणि त्यालाही रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या . त्यामुळे भयग्रस्त झालेले आरोपी अब्दुल रहीम आणि अब्दुल तौफिक हे एम्मेकेरे कोरगज्जा देवस्थानात चुकीविषयी क्षमायाचना करून दानपेटीमध्ये पैसे घालण्यासाठी आले असता त्यांना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी केलेल्या कृत्यांची स्वीकृती दिली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *