मुंबई – पुढचे १५ दिवस कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) राज्यात १४४ कलम लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलच्या रात्री केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
या वेळी ते म्हणाले की, ‘मी कोरोनाला मदत करणार कि कोरोनाविरुद्ध लढणार्या सरकारला मदत करणार’, हे ठरवायचे आहे. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापने बंद रहातील. लोकल आणि बस सेवा अतीआवश्यक कर्मचार्यांसाठी वापरल्या जातील. पेट्रोल पंप, रिझर्व्ह बँक, दूरसंचार सेवा, आरोग्य सेवा आणि संबंधित उद्योग चालू रहातील. हॉटेल, रेस्टॉरंट घरपोच डिलिव्हरी करू शकतील. गाडीवरून खाद्यपदार्थ बांधून घेऊन जाता येतील. ७ कोटी लाभार्थ्यांना पुढचा १ मास ३ किलो गहू आणि १ तांदूळ विनामूल्य देण्यात येईल. पुढचा १ मास २ लाख थाळ्या शिवभोजनाच्या माध्यमातून विनामूल्य देण्यात येतील. ५ लाख अधिकृत फेरीवाल्यांसाठी १५०० रुपये देण्यात येतील. १२ लाख परवानाधारक रिक्शाचालकांना आणि १२ लाख आदिवासी लाभार्थ्यांना साहाय्य करण्यात येईल.