हरिद्वार – ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात वर्तमानकाळात कठोर कायदा होणे आवश्यक आहे. पैशांचे अमीष दाखवून धर्मांतर केले जात आहे. सर्वांच्या मनात स्वाभिमान निर्माण केल्यास निश्चितपणे धर्मांतर रोखले जाऊ शकते, असे प्रतिपादन फरीदाबादमधील (हरियाणा) वल्लभगड येथील अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री महंत भैय्याजी महाराज यांची भेट घेतली, त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.
#HaridwarMahakumbh2021 'लवजिहाद के संदर्भ मे कानून कठोर होना अत्यावश्यक हैIधर्म परिवर्तन पैसेका लालच देकर किया जाता हैIसभी के मन में स्वाभिमान निर्माण करेंगे तो निश्चित रूप से धर्मपरिवर्तन रोका जा सकता है I"-महामंडलेश्वर श्री श्री 1008 परम पूज्य श्री महंत भैय्याजी महाराज, हरियाणा pic.twitter.com/EjSDg8e1E7
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) April 15, 2021
महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘आम्ही संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्यासाठी योग्य सेवा असेल, तर ती सांगावी. त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ.’’