Menu Close

(म्हणे) सनातन संस्थेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार ! – तृप्ती देसाई

स्वत: हिंदु धर्मियांच्या श्रद्धा पायदळी तुडवायच्या आणि त्याला विरोध करणार्‍यांवर बंदीची मागणी करायची, हा पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा होय !

मुंबई : भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्या मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील सनातन संस्थेसारख्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याचा आग्रह धरणार आहेत, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. कोल्हापूर येथील पत्रकार सुभाष देसाई यांना एका निनावी पत्राद्वारे गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्या बोलत होत्या.

तृप्ती देसाई यांनाही १२ फेब्रुवारीला एका निनावी पत्राद्वारे शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याविषयी बोलतांना देसाई म्हणाल्या, मी पोलीस संरक्षण मागितले नाही. पोलिसांना माझ्या जीवाला धोका असल्याचे वाटले, तर त्यांनी संरक्षण पुरवावे. आम्ही दोन दिवसानंतर त्र्यंबकेश्‍वर मंदिरात जाऊन सन्मानाने दर्शन घेणार आहोत. यावेळी रांग अथवा उशीर सहन करणार नाही.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *