Menu Close

राज्यांनी दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय ठेवावा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

श्रीरामाप्रमाणे मर्यांदांचे पालन करा !

नवी देहली – आज नवरात्रीचा शेवटचा दिवस. उद्या रामनवमी आहे. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. त्यामुळे तुम्हीही मर्यादांचे पालन करावे, हाच श्रीरामाचा संदेश आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिलच्या रात्री देशवासियांना दिला. देशाला दळणवळण बंदीपासून वाचवायचे आहे. राज्यांना मी विनंती करतो की, त्यांनी दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय ठेवावा, असे आवाहनही केले.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे

१. कठीणातील कठीण काळात धैर्य न गमावता योग्य निर्णय घेऊन योग्य दिशेने प्रयत्न केले, तर आपला विजय होऊ शकतो. याच मंत्राला समोर ठेवून देशातील यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. गेल्या काही दिवसांत जे निर्णय घेतले गेले, ते परिस्थितीला गतीने पालटतील.

२. आमचा प्रयत्न जनतेचा जीव वाचवण्यासाठी आहे. त्याच वेळी देशाला आर्थिक फटका बसणार नाही, हेही पाहिले जाईल.

३. राज्य प्रशासनाला आग्रह आहे की, त्यांनी कामगारांमध्ये त्यांचे काम बंद होणार नाही आणि त्यांना लसही दिली जाईल, असा विश्‍वास निर्माण करावा.

४. या संकटात नागरिकांनी पुढे येऊन गरजवंतांना साहाय्य करावे. युवकांनी मोहल्ला, प्रभाग आदी ठिकाणी समिती स्थापन करून नियमांचे पालन करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसे केले, तर सरकारला संचारबंदी, दळणवळण बंदी लागू करावी लागणार नाही.

५. प्रसारमाध्यमांनी अशा संकटाच्या वेळी लोकांना सतर्क रहाण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणखी वाढवावेत. भीतीचे वातावरण अल्प होईल, असे प्रयत्न करावेत. लोकांमध्ये अफवा निर्माण करू नयेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *