हरिद्वार – सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. ‘धर्माचरण कसे करावे ?’, ‘प्रत्येक कृती शास्त्रानुसार कशी करावी ?’, ‘गोमातेचे रक्षण करण्याची आवश्यकता काय ?’ आदी सर्व प्रदर्शनाद्वारे चांगल्या प्रकारे सांगितले आहे. हे कार्य प्रशंसनीय आहे. संपूर्ण विश्वामध्ये याचा प्रचार करणे आवश्यक आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी ज्या धर्माचरणाच्या कृती सांगितल्या आहेत, त्यानुसार प्रत्येकाने धर्माचरण करून स्वत:चे जीवन सुरक्षित करावे, असे प्रतिापदन ‘जम्मू-काश्मीर ट्रस्ट’चे शास्त्री वनमाळी यांनी येथे केले. येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.