वॉशिंग्टन (अमेरिका) – कोरोनाच्या या भयंकर प्रकोपामध्ये भारतीय लोकांविषयी आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे. आम्ही भारत सरकारमधील आमच्या सहकार्यांसमवेत मिळून काम करत आहोत. लवकरच आम्ही भारतातील नागरिक आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले आहे. अमेरिकेने कोरोना लसीच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल निर्यात करण्यास बंदी घातल्याने भारताच्या लस उत्पादनामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारताने अमेरिकेला निर्यात बंदी हटवण्याची मागणी होती; मात्र त्याने ती फेटाळून लावली. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या धोरणात अचानक पालट झाल्याचे दिसून आले आहे. भारताकडून अमेरिकेवर टाकण्यात आलेल्या दबावामुळेच ब्लिंकेन यांना वरील विधान करावे लागल्याचे म्हटले जात आहे.
आम्ही भारतीय आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार ! – अमेरिकेला उपरती
Tags : आंतरराष्ट्रीय