बोकारो (झारखंड) – येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (‘सेल’च्या) आयनॉक्स बोकारो प्लांटमध्ये दिवसरात्र द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन बनवले जात आहे. येथे ८-८ घंट्यांच्या पाळीमध्ये दिवसरात्र ऑक्सिजन निर्मिती चालू आहे. प्रतिदिन १५० टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचे लक्ष्य असते. जोपर्यंत ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत येथील कर्मचारी भोजन घेत नाहीत. येथून महाराष्ट्र, उत्तरप्रदेश यांसह अनेक राज्यांत ऑक्सिजन पुरवला जात आहे.
१५० टन ऑक्सिजन उत्पादित केल्याविना प्लांटमधील कर्मचारी भोजन ग्रहण करत नाहीत !
Tags : राष्ट्रीय
0 Comments