Menu Close

बेंगळुरू येथील ऑक्सफर्ड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड !

४-५ घंटे मृतदेह भूमीवरच पडून !

रुग्णालय व्यवस्थापनाची अशी असंवेदनशीलता वैद्यकीय सेवेला कलंकच होत ! अशा घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

ऑक्सफर्ड रुग्णालय

बेंगळुरू (कर्नाटक) – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयाच्या भूमीवर तसेच टाकून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील अत्तिबेले-यडवनहळ्ळी गेटच्या जवळ असलेल्या ऑक्सफर्ड रुग्णालयात घडत असल्याचे समोर आले आहे. येथेच दुसर्‍या खाटेवर असलेल्या रुग्णाने याचा व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याने हे लक्षात आले. या व्हिडिओत एक कोरोनाबाधित रुग्ण खाटेवरून खाली पडला. त्या वेळी त्याच्या साहाय्याला कुणीही आले नाही. त्यानंतर तो मृत झाल्यावरही ४-५ घंटे त्याचा मृतदेह खाली भूमीवरच ठेवला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *