पाकची टीका
भारत श्रीलंकेकडून आदर्श कधी घेणार ?
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाने देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने ही बंदी घालण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. २ वर्षांपूर्वी श्रीलंकेत जिहादी आतंकवाद्याकडून ईस्टर संडेच्या दिवशी चर्चमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Sri Lanka Cabinet Bans All Forms Of Face Veils Including Burqa, Cites National Security Concernshttps://t.co/Dwe361M4l5
— Swarajya (@SwarajyaMag) April 28, 2021
सरकारच्या या निर्णयावर श्रीलंकेतील पाकच्या राजदूतांनी ट्वीट करून टीका करतांना म्हटले, ‘ही बंदी केवळ आणि केवळ श्रीलंकेतील मुसलमानांच्या आणि जगभरातील मुसलमानांच्या भावना दुखावण्याचे काम करणार आहे.’ (प्रत्येक देशाला त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणतेही पाऊल उचलण्याचा अधिकार आहे. पाकने श्रीलंकेवर टीका करण्यापेक्षा जिहादी आतंकवाद्यांवर टीका करण्याचे धाडस दाखवावे. त्यांच्या देशातील जिहादी आतंकवाद्यांचे कारखाने बंद करावेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )