Menu Close

राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

नवी देहली – प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता; मात्र नंतर त्यांचा अहवाल नकारात्मक आला होता. २९ एप्रिलला रात्री श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ३० एप्रिलला दुपारी त्यांचे निधन झाले. ते ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीत कार्यरत होते. ते ‘दंगल’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे. वर्ष २०१८ मध्ये त्यांचा गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ते पूर्वी ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीत कार्यरत होते. तेथे ‘ताल ठोक के’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. राष्ट्र आणि हिंदुत्व हा विषय ते पोटतिडकीने मांडायचे. अवघ्या काही वर्षांत त्यांनी सूत्रसंचालक म्हणून नाव कमावले होते. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदींनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.

रोहित सरदाना यांच्या निधनाने धर्मांधांना आनंद !

धर्मांधांची विकृत मानसिकता ! याविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

रोहित सरदाना यांच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांतून काही धर्मांधांनी आनंद व्यक्त करणारे ट्वीट्स केले आहेत.

१. ‘अली मौला’ नावाच्या ट्विटर हँडलने लिहिले की, घाणेरड्या लोकांची या जगात आवश्यकता नाही. ही एक चांगली बातमी आहे.

२. इरफान बसीर वानी याने फेसबूकवर लिहिले आहे की, सरदाना मुसलमानांविषयी द्वेष पसरवत होते. गेल्या वर्षी तबलिगी जमातच्या विरोधात ते भुंकत होते. कोरोना पसरवणार्‍या बंगालच्या निवडणुका आणि हरिद्वार कुंभ यांची आवश्यकता नव्हती. यामुळेच अल्लाने योजना बनवून सरदाना यांना नरकात जाण्यासाठी निवडले.

३. ‘अक्स’ नावाच्या ट्विटर हँडलने लिहिले की, मुसलमानांना पाकिस्तानात पाठवता पाठवता स्वतःच नरकात गेले.

अशाच प्रकारच्या ट्वीट्स अनेक धर्मांधांकडून करण्यात आल्या आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *