Menu Close

हनुमान जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन

पाटलीपुत्र (बिहार) – सध्या संपूर्ण देश कोरोना संसर्गामुळे ग्रस्त आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी समाजाचे मनोबल वाढावे, त्यांची चिंता न्यून व्हावी आणि भाव-भक्ती वाढावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंतीच्या दिवशी उत्तरप्रदेश अन् बिहार या राज्यांमध्ये सामूहिक नामजप, प्रवचने आदी ‘ऑनलाईन’ उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमांचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचे तत्त्व १ सहस्र पट अधिक असते. हे लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांमध्येही संकट निवारणासाठी हनुमानाच्या पूजनाचे शास्त्र, त्याच्या जपाचे महत्त्व, साडेसाती निवारणासाठी मारुतीची पूजा कशी करावी आदींविषयी माहिती सांगण्यात आली.

लहान मुलांमध्ये हनुमानाविषयी भक्तीभाव वाढावा, यासाठी समितीच्या वतीने बालसंस्कारवर्गांमध्येही त्याचे गुण आणि नामजप यांविषयी माहिती सांगण्यात आली.

या कार्यक्रमाविषयी जिज्ञासूंनी सांगितले की, या कार्यक्रमांमुळे त्यांची ईश्वरावरची श्रद्धा वाढली आणि मन स्थिर होऊन सकारात्मक झाले. अशा प्रकारचे आयोजन यापुढेही व्हावे, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *