Menu Close

आय.पी.एल्.मधील कोलकाताच्या संघातील २ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने सामना रहित !

कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सांगत हरिद्वार येथील कुंभमेळा रहित करण्याची मागणी करणारे आय.पी.एल्.विषयी गप्प का आहेत ?

कोलकाता – भारतात चालू असलेल्या इंडियन प्रिमियर लीगमधील (आय.पी.एल्.मधील) ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच आणखी काही खेळाडूंची प्रकृती बिघडल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ यांच्यातील सामना रहित करण्यात आला आहे. नियोजित सामना पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. या बाधित खेळाडूंसमवेतच्या इतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी नकारात्मक आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *