वर्ष 1947 प्रमाणे भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती टाळायची असेल,तर वीर सावरकरांचाच मार्ग अनुसरावा लागेल ! – श्री. रणजीत सावरकर
मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंना नेहमी सतर्क केले आहे. त्यांनी सांगितलेली अनेक भाकीते खरी ठरली आहेत. वर्ष 1920 मध्ये तेव्हाच्या भारतात मुसलमानांची लोकसंख्या 22 प्रतिशत झाल्यावर खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याच्या नावाखाली देशभरात दंगली करून केरळ-बंगालमध्ये लाखो हिंदूंना ठार मारले. गेल्या वर्षी 2020 मध्ये पुन्हा 22 प्रतिशत लोकसंख्या झालेल्या मुसलमानांनी 100 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती करत दिल्लीत दंगल करून अनेक हिंदूंना मारले. वर्ष 1947 ला त्यांची लोकसंख्या 35 प्रतिशत झाल्यावर त्यांनी त्या वेळी देशभरात दंगली घडवून भारताचे विभाजन केले. तर वर्ष 2047 मध्ये त्यांची लोकसंख्या 35 प्रतिशत झाल्यास भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. ही इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि हिंदूंना वाचवायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर : अंदमान कारावासातून सुटकेची शताब्दी पूर्ती’ या ऑनलाईन विशेष परिसंवादात बोलत होते. हा कार्यक्रम ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून 5431 लोकांनी पाहिला.
या वेळी बोलतांना भारताचे माहिती आयुक्त तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. उदय माहूरकर म्हणाले की, वीर सावरकर यांचा प्रखर राष्ट्रवाद हा मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या आड येत असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांना विरोध झाला. सावरकरांचे म्हणणे ऐकले असते, तर वर्ष 1947 ला देशाचे विभाजन झाले नसते. विभाजनाची सिद्धता चालू असल्याविषयी ते वर्ष 1936 पासून सांगत होते. सावरकरांचे विचार कृतीत आणले, तर संपूर्ण देश एक होऊ शकतो; मात्र या लोकांना ते नको आहे. सावरकरांना तीन प्रकारचे लोक विरोध करतात, एक म्हणजे मुसलमान पक्ष, दुसरे कम्युनिस्ट आणि तिसरे मुसलमानांच्या मतांसाठी भिकारी असणारे राजकीय पक्ष ! या वेळी बोलतांना प्रसिद्ध लेखक आणि प्रवचनकार श्री. सच्चिदानंद शेवडे म्हणाले की, अंदमानातील छळामुळे काही कैद्यांनी आत्महत्या केली, तर काही वेडे झाले; मात्र या सर्व कठोर यातना सहन करत वीर सावरकरांनी राष्ट्रहितासाठी हजारो पानांचे अजरामर साहित्य लिहिले. ‘धर्माचे स्थान हृदयात असते, पोटात नाही’, असे सांगून कारागृहात धर्मांतरीत हिंदूंचे शुद्धीकरण त्यांनी केले. सावरकरांनी हिंदूंना राष्ट्रीय अस्मिता जपण्यासाठी शिकवले. या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमीत सागवेकर म्हणाले की, सावरकरांना माफीवीर म्हणणारे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी हिंमत असेल, तर अंदमानात जाऊन कोलू फिरवून दाखवावा. केवळ दोन-तीन भाषणे दिल्यावर विश्रांतीसाठी बँकाकमध्ये जाणार्यांकडून काय अपेक्षा करू शकतो. जेएन्यूमध्ये सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासणार्या ‘तुकडे-तुकडे गँग’ने प्रथम उत्तर द्यावे की, ‘कॉम्रेड डांगे यांनी ब्रिटिशांची माफी का मागितली होती आणि ‘ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहीन’, असे का म्हटले होते ?