Menu Close

अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ७ किलो युरेनियम बाळगणार्‍या दोघांना अटक !

युरेनियमचे मूल्य २१ कोटी रुपये

मुंबई – महाराष्ट्रातील आतंकवादविरोधी पथकाने मुंबईतील नागपाडा येथून जिगर पंड्या (वय २७ वर्षे) आणि त्याचा मानखुर्द येथील मित्र अबू ताहीर (वय ३१ वर्षे) यांच्याकडून ७ किलो युरेनियम जप्त केले असून त्यांना अटक केली आहे. युरेनियम खरेदी करण्यासाठी कुणी इच्छुक आहे का, याचा ते दोघे शोध घेत असतांनाच पथकाने धाड टाकली.

युरेनियमचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य २१ कोटी रुपये इतके आहे. युरेनियम हा दुर्मिळ धातूंपैकी एक आहे. किरणोत्सर्ग करणार्‍या या धातूचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला जातो. संबंधित दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *