-
कोरोनाचे मोठे संकट असतांनाही त्याविषयीचे नियम आणि आदेश धुडकावणारे उद्दाम धर्मांध !
-
धर्मांधांकडे प्रत्येक वेळी आक्रमणासाठीचे साहित्य कसे काय सापडते ? यावरून हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याची शक्यता नाकारता येत नाही !
नंदुरबार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादलेले असतांनाही रमझान मासात येथील मुसलमान मोठ्या संख्येने मशिदीत नमाजपठणासाठी जात होते. त्या वेळी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मशिदीत गर्दी न करण्याविषयी काहींनी त्यांना सांगितले. तेव्हा धर्मांधांनी ‘तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलेच कसे ?’, असे म्हणत लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिक यांद्वारे आक्रमण केले. यात ६ जण घायाळ झाले. सध्या येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी १२ जणांना अटक केली, तर ९ जणांचा शोध चालू आहे. घायाळ झालेल्यांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या नियमावलीनुसार मशिदीत एकावेळी केवळ ५ जणांनाच प्रवेश आहे.