-
कोविड सेंटरचा स्तुत्य उपक्रम !
-
दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आणि गायत्री मंत्र यांचा जप
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये १ सहस्र खाटांच्या कोविड सेंटरचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे सेंटर सौम्य ते मध्यम प्रकारची लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी आहे. येथे अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रुग्णांचे मन गुंतवून ठेवण्यासाठी एका मोठ्या स्क्रीनवर रामायण आणि महाभारत या मालिकांचे प्रसारण केले जात आहे. दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आणि गायत्री मंत्र यांचा जप चालू ठेवण्यात येत आहे. तसेच प्रतिदिन योगासनेही शिकवली जात आहेत.
MP: हजार खाटांचं जंबो कोविड सेंटर आणि भव्य पडद्यावर दिसणार रामायण https://t.co/0YNmUQvq4o via @LoksattaLive #CoronaVirus #CoronavirusIndia #MadhyaPradesh #Ramayana
— LoksattaLive (@LoksattaLive) May 10, 2021
या सेंटरला विविध वॉर्डमध्ये विभागण्यात आले असून त्यांना स्वातंत्र्यसैनिक आणि प्रसिद्ध व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत. यात सुभाषचंद्र बोस, अब्दुल कलाम, सरदार वल्लभभाई पटेल, राजा भोज आदी नावे आहेत. महिलांच्या वॉर्डंना राणी लक्ष्मीबाई आणि राणी कमलापती अशी नावे ठेवण्यात आली आहेत.