Menu Close

…तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायला हवे का ?

लसीच्या प्रश्‍नावर केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांचे चिडून उत्तर

शासनकर्त्यांनी जनतेच्या प्रश्‍नांना सामोरे जाऊन त्यांचे शंकानिरसन करणे आवश्यक असते; मात्र ते करतांना चिडत असल्यास जनतेच्या मनात कधीतरी त्यांच्याविषयी सद्भावना निर्माण होऊ शकेल का ?
सदानंद गौडा

बेंगळुरू (कर्नाटक) – देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करायला हवे, ही सर्वोच्च न्यायालयाने चांगल्या हेतूने केलेली टिप्पणी आहे. मी तुम्हाला विचारू इच्छितो की, उद्या न्यायालयाने सांगितले की, ‘तुम्हाला अमुक इतके डोस द्यायला हवेत;’ मात्र तेवढे उत्पादन होऊ शकले नाही, तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायला हवे का ?’ असा प्रश्‍न केंद्रीय रसायनमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी चिडून पत्रकारांना विचारला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *