महंबद पैगंबर यांचे व्यंगचित्र छापणार्या शार्ली हेब्दो नियतकालिकाकडून ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून हिंदूंच्या देवतांचा अवमान !
-
हिंदूंच्या देवतांची संख्याही नीट ठाऊक नाही, ते त्यांच्यावर टीका करतात, यातून ते किती अज्ञानी आहेत, हे स्पष्ट होते !
-
सृष्टीची उत्पत्ती देवतांनीच केली असल्याने त्यात ऑक्सिजनचाही समावेश आहे; मात्र आताची स्थिती देवतांमुळे नाही, तर प्रशासन आणि अन्य यंत्रणा यांच्या चुकांमुळे झालेली आहे. भारतातीलच नव्हे, तर जगातील लोक साधना करणारे असते, तर कोरोनासारखे संकट आले नसते किंवा आलेच असते, तरी ते इतके भयावह झाले नसते, हेही तितकेच खरे आहे !
-
एखाद्याचे व्यंगचित्र काढण्यापेक्षा चुकीचा विचार मांडणे अधिक चुकीचे आहे, त्यामुळे हिंदू शार्ली हेब्दोची टीका कदापी स्वीकारणार नाही ! याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे आणि हिंदूंची क्षमा मागावी !
-
‘आकाशातील बाप तुम्हाला साहाय्य करील’, असे चर्चमधून सांगितले जाते, तर ‘शार्ली हेब्दो आताच्या स्थितीवरून त्यावर प्रश्न का विचारत नाही ?’, असा प्रश्न कुणी उपस्थित केला, तर त्यावर शार्ली हेब्दो काय उत्तर देणार आहे ?
-
हिंदु धर्म महान असल्याने त्याच्याकडे ३३ कोटी देवता असून प्रत्येक देवतेचे कार्य वेगवेगळे आहेत. संगीत, नृत्य, चित्रकला, विद्या, वास्तूशास्त्र आदींच्या देवता आहेत. प्राणशक्तीसाठी श्रीगणेश ही देवता आहे; मात्र हे धर्मशास्त्र हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ठाऊक नाही. त्याचाच अपलाभ शार्ली हेब्दोसारखी नियतकालिके घेत आहेत. हिंदूंनी हे लक्षात घेऊन धर्मशिक्षण घ्यायला हवे !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात
पॅरिस (फ्रान्स) – महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केलेल्या फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी होणार्या मृत्यूसाठी उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. या नियतकालिकाच्या अंकामध्ये भारतात ऑक्सिजनचा तुटवडा आणि कोरोनाचा वाढता संसर्ग यांवर प्रसिद्ध झालेल्या चित्रात अनेक भारतीय भूमीवर झोपले असून ते ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. या चित्राच्या खाली लिहिले आहे, ‘३ कोटी ३० लाख देवता; मात्र एकही ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास सक्षम नाही.
Leave behind #CharlieHebdo cartoon mocking Hinduism (which is illogical in any sense anyways), leftist-secular & champagne socialist brigade lack maturity & social responsibility. They should've outrightly negated the magazine's cartoon amidst human catastrophe in India.
SHAME!
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) May 15, 2021
१. या चित्रास सामाजिक माध्यमांतून विरोध केला जात आहे. शार्ली हेब्दोवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करत काही जणांकडून याचे समर्थनही केले जात आहे.
२. एका ट्विटर वापरकर्त्याने शार्ली हेब्दोला उद्देशून लिहिले आहे की, ३ कोटी ३० लाख नाही, तर आमच्याकडे ३३ कोटी देवता आहेत. त्यांनी आम्हाला कधीही न हरण्याचे ज्ञान दिले आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि फ्रान्सच्या नागरिकांचा मान राखतो. त्यामुळे तुम्ही चिंता करू नये. तुमच्या कार्यालयावर किंवा कर्मचार्यांवर आक्रमण केले जाणार नाही.
३. अन्य एका वापरकत्यार्र्ने लिहिले आहे की, ३३ कोटी देवता निसर्गामध्ये वसलेले आहेत. भारतासारखे देश तुमच्यासारख्या देशांचे अनुकरण करत वृक्षतोड करत आहेत. आम्ही वृक्षांना देवतांच्या रूपात मानतो.
४. लेखक देवदत्त पटनायक यांनी लिहिले की, शार्ली हेब्दोने महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढल्यावर हिंदुत्वनिष्ठांमध्ये त्याला समर्थन मिळाले होते; मात्र आता ते देवतांच्या व्यंगचित्रामुळे दुखावले आहेत. आता ते काय बोलणार आहेत ? (शार्ली हेब्दोने देवतांचा अवमान केल्याचा संताप येण्यापेक्षा हिंदुत्वनिष्ठ दुखावले गेल्याचा आनंद पटनायक यांना झाल्याचे यातून दिसत आहे. अशांमुळेच हिंदुद्वेष्ट्यांचे फावते आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) आम्ही कुणाचाही शिरच्छेद करणार नाही; मात्र लोक संकट आणि नेते यांची निष्क्रीयता पाहू शकत नाहीत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात