Menu Close

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

‘अ‍ॅप’चे लोकार्पण करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

गोवा – सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे १४ मेला अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ‘ऑनलाईन सत्संगा’त लोकार्पण करण्यात आले. ‘आगामी तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये कोट्यवधी लोक मृत्यू पावतील’, अशा आशयाचे भाकीत नॉस्ट्रॅडॅमससारखे भविष्यवेत्ते, प.पू. गगनगिरी महाराज यांच्यासारखे संत, महर्षि आदींनी वर्तवले आहे. सध्याच्या जागतिक घडामोडी पहाता आपत्काळ अगदी उंबरठ्यापर्यंत आला आहे. या दृष्टीने या अ‍ॅपमध्ये ‘आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ईश्‍वराची कृपा कशी संपादन करावी ? आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक, भौतिक आदी सिद्धता कशी करावी ?’, यांविषयी विवेचन केले आहे. हे अ‍ॅप मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगु, तमिळ, मल्ल्याळम् आणि नेपाळी या ९ भाषांत उपलब्ध आहे. एकदा वाचलेला मजकूर नंतर ‘ऑफलाईन’ (इंटरनेटच्या वापराखेरीज) वाचता येण्याची सुविधा यात आहे. हे अ‍ॅप ‘Play store’वर निःशुल्क उपलब्ध आहे. ‘वाचकांनी हे अ‍ॅप आपल्या भ्रमणभाषमध्ये डाऊनलोड करून यातील अमूल्य ज्ञानाचा लाभ करून घ्यावा, तसेच आपले परिचित, नातेवाईक यांनाही डाऊनलोड करायला सांगावे’, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक

https://www.sanatan.org/survival-guide-app

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *